पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांकडून छुप्या पद्धतीने अफूची झाडे लावण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत अफूची शेती केल्याच्या अनेक घटना समोर आल्याने पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पाच दिवसांपूर्वीच पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरातून 10 किलो अफू जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. 04 मार्च) पुन्हा पुरंदरमधील मावाडी गावातून पाऊण लाख रुपये किमतीची 38 किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Pune: Opium trees planted in onion, garlic fields in Purandar taluka, two arrested)
हेही वाचा… शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला, संजय राऊत यांचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना पुरंदर तालुक्यातील मावाडी गावात अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेजुरी आणि भोर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. तर, अफूची विनापरवाना शेती केल्याप्रकरणी किरण कुंडलिक जगताप (वय 40) आणि रोहिदास चांगदेव जगताप (वय 55, दोघे रा. कोडित बुद्रुक, ता. पुरंदर, जि. पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. कांदा आणि लसणाच्या पिकांमध्ये अफूची झाडे लावण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी जगताप यांना अटक करण्यात आली असून, जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच दिवसांपूर्वीच पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात अफूची शेती केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळीही शेतातून आठ किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली होती. 28 फेब्रुवारीला केलेल्या छापेमारीत पोलिसांनी अफूची 10 झाडे जप्त केली होती. या प्रकरणात पोलिसांनी दशरथ सिताराम बडदे आणि तानाजी निवृत्ती बडधे या दोघांना अटक केली.
महत्त्वाची बाब म्हणजे, पुरंदर तालुक्यातच अशी प्रकरणे समोर येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. कारण शेतकऱ्यांना अफूची बोंडे पुरविण्यात नेमके कोण मदत करत आहेत? याबाबतचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ज्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.