घरमहाराष्ट्रपवार कुटुंब एकत्र; अजित पवारांसोबत झालेल्या भेटीवर शरद पवारांनी एका वाक्यात दिली...

पवार कुटुंब एकत्र; अजित पवारांसोबत झालेल्या भेटीवर शरद पवारांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. दिवाळीनिमित्त शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी हे दोन्ही नेते एकत्र आले.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. दिवाळीनिमित्त शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजित पवार व शरद पवार यांचं यावेळी एकत्र जेवणही झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Pune Pawar family together Sharad Pawar reacted in one sentence to his meeting with Ajit Pawar Prataprao Pawar Birthday )

शरद पवार म्हणाले की, ही एक कौटुंबिक भेट होती त्यामुळे या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. तसंच, शरद पवार यांनी यावेळी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु शरद पवार जरी ही राजकीय भेट नसल्याचं बोलत असले तरीही या भेटीमुळे पवार कुटुंबातील दोन्ही नेते चर्चेचा विषय ठरले आहेत.  शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकाच छताखाली असल्यानं राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे. हे दिवाळी सेलिब्रेशन होत की आता राजकीय फटाके फोडले जाणार आहेत. यावर सध्या चर्चांना वेग आला आहे.

- Advertisement -

पवार कुटुंब एकत्र

शरद पवार यांचे प्रतापराव पवार बंधू आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवर यांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. त्यांचा आज वाढदिवस आहे तसंच त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये गोविंदबाग येथे एकत्र येतात. यंदा प्रतापराव यांच्या पत्नी प्रकृती बरी नसल्यामुळे बारामतीमध्ये येणार नाही. यामुळे ही संपूर्णपणे कौटुंबिक भेट शुक्रवारी झाली आहे.

(हेही वाचा: शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल? उज्ज्वल निकम यांचे सूचक वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -