आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, त्यानंतर ‘डुप्लिकेट’वर पुणे पोलिसांत गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले. मात्र, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले. मात्र, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. विजय नंदकुमार माने असे त्याचे नाव असून, आतापर्यंत त्याने एकनाथ शिंदे यांच्यासारखा पोषाक परिधान करून अनेक सोहळ्यांमध्ये हजोरी लावली. त्यावेळी अनेकांनी त्याच्या उपस्थितीला आपलंस केले. तसेच, विजय माने याने काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र सध्या याच विजय माने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावर टिळा आणि व्हाईट शर्ट आणि पॅन्ट असा पोषाक परिधान केल्यामुळे तो हुबेहुब एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत आहे. मात्र, विजय माने यांच्यावर पुणे पोलिसांनी सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो सेशन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (pune police action on eknath shinde duplicate vijay mane filed a case due to photo session with criminal)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने पुण्यात हवा करत असलेल्या तरुणावर पुणेपोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप माने याला अटक करण्यात आलेली नाही.

विजय माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोषाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हॉटसॲप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे.

फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून, तो विजय माने याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या फिर्यादीत “विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करुन मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरविल्याचे”, म्हटले आहे.

दरम्यान, विजयराज माने या पुण्यातील आंबेगाव पठार येथील तरूणाला गणेशोत्सव काळात अनेक सुपऱ्या मिळाल्याच्याही चर्चा होत्या. अनेक गणेश मंडळे त्याला आरतीसाठी निमंत्रण देत होती. काही दिवसांतच स्टार झालेल्या या तरूणाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या परिसरातील प्रश्न मांडले आहेत.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर राजपत्रित अधिकारी महासंघाचे प्रस्तावित आंदोलन मागे