Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Pooja Chavan Suicide Case: पोलिसांनी घेतले दोन जणांना ताब्यात

Pooja Chavan Suicide Case: पोलिसांनी घेतले दोन जणांना ताब्यात

Related Story

- Advertisement -

टीकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पूजाच्या आत्महत्येला अकरा दिवस उलटले असून आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्यापही समजलेले नाही. यामुळे या दोघांच्या चौकशीतून काही महत्वाचे धागेदारे मिळतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

इंग्लिश स्पिकींग कोर्स करण्यासाठी पूजा बीडहून पुण्याला आली होती. तेथे ती विलास चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यासोबत राहत होती. ८ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास तिने इमारतीच्या गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी विलास व अरुण तिथे उपस्थित होते. त्यानंतर पूजा आणि अरुण यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात वनमंत्री संजय राठोड यांचेही संभाषण होते. यामुळे राठोड यांचे पूजाच्या आत्महत्येशी काय कनेक्शन आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. तर संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

२३ वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितले होते. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवले. त्यानंतर पूजाने हे टोकाचे पाऊल का उचलले याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढे आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत.

- Advertisement -