आठ वर्षापासून पुण्यात राहणाऱ्या पाकिस्तानी तरूणाला अटक, बनावट पासपोर्टही जप्त

त्याचा संबंध दहशतवादी कारवायांशी आहेत का? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.

Pakistani Man Arrested

गेल्या आठ वर्षापासून पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाकडून भारताचा बनावट पासपोर्ट मिळाला आहे. महम्मद अमान अन्सारी (वय २२ वर्ष) असं या पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. हा तरुण पुण्यात नेमक्या कोणत्या कारणाने वास्तव्य करत होता, याचा तपास पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ पासून भवानी पेठेतील तालीमजवळ चुडामण इथे बेकायदा वास्तव्य करत होता. पोलिसांना या तरुणाकडून बनावट पाकिस्तानी पासपोर्टही मिळाला आहे. हा पासपोर्ट वापरून तो दुबईला सुद्धा गेला आहे. त्याच्या पुण्यात वास्तव्याचे नेमके कारण काय होते, हे त्या तरुणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आई वडिलांच्या कौटुंबिक भांडणाला कंटाळून हा तरूण आजीकडे येऊन राहत असल्याचं सांगण्यात येत आहेत. महम्मद अन्सारी याची आई ही भारतीय असून त्यांनी पकिस्तानी नागरिक असलेल्या अमान यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ते दोघेही पाकिस्तानला गेले. मुलगा झाल्यानंतर त्यांच्यात भांडण होऊ लागले. अखेर त्याच्या आई पतीला सोडून सध्या युएईमध्ये राहू लागली. महम्मद याचा जन्म पाकिस्तानात झाला. त्याच्या शिक्षणासाठी २०१५ मध्ये त्याच्या आईने त्याला पुण्यात आजीकडे आणलं होतं. पुण्यात तो शिक्षण घेत असताना त्याने बनावट कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविला. त्याचा वापर करुन तो पुणे व दुबई विमान प्रवास करुन तो आपल्या आईलाही भेटायला गेला होता, असं देखील या तरूणाने सांगितलं.

त्याचा संबंध दहशतवादी कारवायांशी आहेत का? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलिसांनीही घुसखोरांवर कारवाई सुरु केली आहे. मुंबईही बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत.