घरताज्या घडामोडीबनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई

Subscribe

मुंबईतील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कॉल सेंटरमधून फेक कॉलद्वारे लोकांना लुटलं जात होतं. या कारवाईत चाळीस मोबाईल फोन, सात हार्ड डिस्क आणि इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं आहे.

नमस्ते, मी बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिक्युटिव्ह बोलत आहे, असे कॉल करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचं काम या कॉल सेंटरमधून सुरु होतं. हे आरोपी महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉलद्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचं सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करायचे. नागरिकांकडून त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो या गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेऊन लोनचे सहा महिन्यांचे प्रीमियम 2,50,000 रुपये होत असल्याचे सांगायचे आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक करायचे.

- Advertisement -

पुण्यातील एका व्यक्तीची बिनव्याजी लोनच्या नावाने म्हणून अडीच लाख रुपयांची फसवणूक झाली होती. पुणे पोलिसांकडे याची तक्रार येताच त्यांनी या कॉल सेंटरचा शोध घेतला. हे कॉल सेंटर मुंबईतील मुलुंड भागात सुरु असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी काल गुरुवारी रात्री धाड टाकून कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या ठिकाणी बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स नावाने हे कॉल सेंटर बेकायदेशीररित्या चालवले जात होते.

हे कॉल सेंटर 43 कर्मचाऱ्यांच्या मार्फत चालवलं जात होतं. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दानेश रविंद्र ब्रिद, रोहित संतोष पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

कॉल सेंटरवर धाड टाकली तेव्हा तिथे 43 मुले आणि मुली फसवणुकीचं काम करत होते. त्यांना ग्राहकांसोबत बोलण्यासाठी एक स्क्रिप्ट दिली जात होती. बोलण्यात ती व्यक्ती गुंतली की कर्मचारी फसवणूक करण्यासाठी तयार केलेली लिंक ग्राहकाला पाठवत होते. त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात होती, अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली.


हेही वाचा : शिक्षिकांचं भांडण, विद्यार्थीनीवर राग; सरळ पहिल्या मजल्यावरून दिले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -