घरताज्या घडामोडीलोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

Subscribe

लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या 18 जणांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रीय होती.

लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या 18 जणांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रीय होती. या फसवणुकीची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी कारवाई करत हजारो खाती गोठवण्यात आली असून तब्बल 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यात आहे. (pune Police busted loan app fraud and freezes thousands of accounts arrests 18 people)

पुणे पोलिसांनी देशभरातील हा लोन ॲप घोटाळा उघडकीस आणला आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सध्या झटपट कर्ज मिळवण्याकरीता काही अॅप आले आहेत. या अॅपमुळे देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे तब्बल 1 लाख लोकांचा डेटा तयार होता. या सगळ्यांना फसवण्यासाठी 16 ॲप तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, या अॅपच्या माध्यमातून फसवणुक करण्याची टोळीची तयारी होती.

याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता, संबंधितांचा डेटा, फोटो घेऊन ते मॅार्फ करून तुमच्या कॉनटॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवले जात होते. त्याबदल्यात पैसे मागणाऱ्या या दरोडेखोरांच्या मागे अगदी परदेशातल्या सिंडीकेट काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

याशिवाय, दरोडेखोरांनी फोन करण्यासाठी लाखो सिमकार्ड वापरले असून, ज्या खात्यांवर पैसे घेण्यात आले आहेत, हे सर्वजण कमी शिकलेले किंवा मजूर यांची आधारकार्ड बनवून त्यांवर तयार केलेली खाती ही फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी वापरण्यात आली आहेत.


हेही वाचा – शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -