घरमहाराष्ट्रपुण्याच्या पोलीस आयुक्तांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय

पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय

Subscribe

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण

बीडची तरुणी पूजा चव्हाणचा सात फेब्रुवारीला पुण्यात मृत्यू झाला. मात्र, याबाबत पुणे पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकारांनी भर पत्रकार परिषदेत विविध प्रश्न विचारताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र हसून थेट पत्रकार परिषदेतूनच काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालात काय आले आहे? पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा कधी दाखल होणार आहे? तपास कुठवर आला? असे विविध प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले होते. मात्र यावर पोलीस आयुक्तांनी फक्त हसून चालू पत्रकार परिषदेतून पळ काढला.

- Advertisement -

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरून तुम्ही नवे अंदाज बांधाल, असे नगराळे यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -