घरCORONA UPDATEVideo : पुणे पोलिसांनी शेअर केलेला व्हिडिओ बघून डोळ्यात नक्की पाणी येईल!

Video : पुणे पोलिसांनी शेअर केलेला व्हिडिओ बघून डोळ्यात नक्की पाणी येईल!

Subscribe

या कोरोना व्हायरसच्या संकटात डॉक्टर्स आणि पोलीस आपले प्राण धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करीत आहेत. डॉक्टर्स दवाखान्यात पेशंट्सचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलीस ऑन ड्यूटी २४ तास जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करतात. पण आपल्या सारखेच त्यांचे ही घरी वाट पाहणारं कुटुंब असतं. त्यांच्या कुटंबावर त्याचा काय परिणाम होत असेल, तसेच पोलिसांचे मनोधैर्य दाखविणारा एक व्हिडिओ  पुणे पोलिसांनी तयार केला आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मनाला भिडेल.

#KhakiOnDuty

#कर्तव्य प्रथम…#Duty first.. We will #DoMore

Pune City Police ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜೂನ್ 5, 2020

- Advertisement -

काय आहे व्हिडिओत

सलग तीन दिवस काम करून एक पोलीस आपल्या घरी परततो. तीन दिवसांनंतर घरी आल्यावर त्याला क्षणभर झोप हवी असते. त्यांनतर त्याला पुन्हा ड्यूटीवर जायचं असतं. घरात गेल्यावर मात्र त्याची बायको चिंताग्रस्त असते. बायकोच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते, शेजारच्या शिंदेंना कोरोना झाला, मात्र शिंदे काकुंना कुणीही भेटायला गेलं नाही. माणुसकीच राहिली नाही. मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला काही झालं तर? त्यावर त्या पोलिसांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाच आहे. तो म्हणतो,  मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी लोकांच्या रक्षणाची शपथ घेतलीय. त्यांना वाऱ्यावर सोडून मी घरी राहू शकत नाही. आणि कोरोना हा बरा होणारा आजार आहे. अनेक जण त्यातून बरे झाले आहेत.

त्यामुळे आपण गावाकडे जाण्याचा विचार न करता शिंदे काकुंना भेटायला जावू. यातून पुणे पोलिसांनी जन जागृती करत सगळ्या समाजालाच योग्य संदेश दिला आहे. हा व्हिडिओ नागरिकांना खूप आवडत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – धक्कादायक! नवऱ्याने मित्रांना बोलवून बायकोवर केला बलात्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -