राज्यातील सत्तासंघर्षाचा पोलिसांना फटका; २२ जुलैपर्यंत सुट्ट्या रद्द

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्षावरून वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आव्हान केले आहे. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत.

police

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्षावरून वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आव्हान केले आहे. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. एकिकडे सुरू असलेले राजकिय नेत्यांचे राजकारण आणि दुसरीकडे याच राजकारणामुळे महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे पुणे पोलिसांना (Pune Police) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत वैद्यकीय रजेशिवाय पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. (pune police leave canceled till july 22 due to political issues in maharashtra)

महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष

सध्या महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस अनेक राजकीय बदल होत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सत्तासंघर्षाच्या राजकारणामुळे पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील पोलिसांना २८ जून ते १२ जुलै या कालावधीत कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे.

हेही वाचा – ठाकरे पिता- पुत्रासह संजय राऊतांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा निर्णय घेतल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांना आता सुट्टी घेता येणार नसल्यामुळे पोलिसांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शिंदेंच्या बंडाचा आज आठवा दिवस

बंडानंतर एकनाथ शिंदे हे ट्विटरच्या माध्यमातून आपली भुमिका मांडत आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. मागील ८ दिवसांत शिंदे यांनी केवळ ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांसमोर आणि जनतेसमोर आपली बाजू मांडली आहे. नुकताच एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडाचे कारण सांगितले. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितले.

ट्विट करत नाराजी व्यक्त

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन आपली बाजू माडण्याचे आवाहन केले आहे. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. “एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याचीघाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावर एकनाथ शिंदेंचे प्रश्नचिन्ह