पुणेकरांसाठी पोलीस सज्ज, ११२ हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम

पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्रात '११२' ही टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्रात ‘११२’ ही टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याच ‘११२’ या एकाच हेल्पलाईनवरून आता पुणेकरांना सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. (Pune police modern control room 112 helpline 157 police vehicles)

या एका हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमनदल आणि महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत उपलब्ध करून दिली आहे. जीपीएसच्या यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोणत्या स्थळावरुन आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे.

अशी आहे सुविधा

महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी असलेला ११२ हा आपत्कालीन नंबर अमेरिकेच्या ९११ या हेल्पलाईन नंबरसारखा आहे. इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम (ERSS)यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. ११२ या नंबरवरुन मदत मागितल्यास घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्यांची माहिती जाईल, याद्वारे तक्रारदाराला कमीत कमी वेळात मदत केली जाईल

याआधीचे नंबर

  • पोलीसांच्या मदतीसाठी १०० नंबर
  • महिला हेल्पलाईनसाठी १०९१ नंबर
  • चाईल्ड हेल्पलाईनसाठी १०९८ नंबर

दरम्यान, अनेक घटनांचे गांभीर्य लक्षात घेतला. पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन या सगळ्यांना आता एकाच नंबरवर सगळ्याप्रकारची मदत मिळणार आहे. घडलेल्या घटनेच्या आवश्यकतेनुसार यंत्रणा घटनास्थळी दाखल होणार आहे.

पोलिस आयुक्तालयातील पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस विभागाच्या १५७ वाहनांवर एमडीटी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी तातडीने पोलिसांची मदत केली जाईल, असे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.


हेही वाचा – औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय