पुणे पोलिसांनी घेतला मेडिटेशनचा आधार

कामाचा ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे. पोलिसांना ही कामाचा तणाव असतो. हा तणाव कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ओशो इंटरनॅशनल सेंटरमध्ये मेडिटेशन केले.

pune police
ओशो इंटरनॅशनल आश्रम बाहेरील पोलीस अधिकारी

तणावामुळे सध्या आत्महत्याचे प्रमाण वाढत आहेत. तणावमुक्त करण्यासाठी अनेकजण सुट्टीवर जातात मात्र सुट्टीवरुन कामावर आल्यानंतर पुन्हा कामाचा तणाव असतोच. कामामुळे आलेल्या मानसिक तणावाला दुर करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता मेडिटेशनचा आधार घेतला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो इंटरनॅशनल सेंटरमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी मोडिटेशन केले. मेडिटेशनच्या पद्धतींमुळे मनात येणारे वाईट विचार थांबवण्यास मदत होते. पोलिंसांच्या कामाची वेळ ठरलेली नसल्यामुळे त्यांना अधिक वेळ काम करावे लागते. यामुळे अनेकदा मानसिक तणावही आल्याचे दिसून आले आहे. पर्याय कर्तव्यावर असलेले अधिकारी अनेकदा आत्महत्येचा पर्याय स्विकारतांना दिसतात. यामुळे थोडावेळ मेडिटेशन करुन तणाव मुक्त रहाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सहाय्यक आयुक्तांनीही केले मेडिटेशन

विभाग दोनचे सहाय्यक आयुक्त एसीपी बच्चन सिंग यांनी आपल्या काही अधिकाऱ्यांबरोबर मेडिटेशन केले. यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तीन तासाच्या या मेडिटेशनमध्ये हवालदार, पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही भाग घेतला. ओशो मेडिटेशन सेंटरमध्ये हे मेडिटेशन करण्यात आले होते. या मेडिटेशनमध्ये पोलीस अधिकारी तणाव मुक्त करण्यासाठी नाचत होते. तणावमुक्त होण्यासाठी बहुतेक लोक आजकाल मेडिटेशनचा आधार घेत आहेत. मेडिटेशनमुळे शारीरिक आणि मानसिक तणावापासून मुक्त होतो.