घरCORONA UPDATELockdown - खारी आणायला गेला; मिळाली डझनभर केळी खाण्याची शिक्षा!

Lockdown – खारी आणायला गेला; मिळाली डझनभर केळी खाण्याची शिक्षा!

Subscribe

कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तरीही नागरिक काहीना काही कारणं काढून घराबाहेर पडत आहेत. पोलिसांनी फटके देऊन बघितलं, विनंती करून बघितली तरी नागरिक रस्त्यावर फिरायचं काही थांबवत नाहीयेत. आता पोलिसांनी शिक्षेची नामी युक्ती शोधून काढली आहे.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील हॉटस्पॉटची संख्या ही वाढली आहे. पुण्यात समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत करोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भागात खारी आणण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली. त्याला चक्क डझनभर केळी खाण्याची शिक्षा करण्यात आली. त्याच्या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. नागरिकांकडून व्यायाम करवून घेणे, उठाबशा करायला लावणे, सूर्यनमस्कार करण्यास सांगणे आणि गुन्हे दाखल करणे अशा शिक्षा दिल्या जात आहेत. तरीही काहीजण बाहेर पडत आहेत. समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी करोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्या परिसरात एक तरुण सकाळी खारी आण्यासाठी बाहेर पडला होता. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्याने खारी आणण्यास जात असल्याचे सांगितले, तेव्हा पोलिसांनी कपाळाला हात लावला. त्याची खोड मोडण्यासाठी पोलिसांनी त्याला एक डझनभर केळी खायला लावली. त्याला दिलेल्या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


हे ही वाचा – ‘आयुष्यातील पहिलं बक्षीस घ्यायला माझ्याकडे पैसेच नव्हते’- कंगना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -