शरद पवारांच्या हत्येचा कट? पुण्यात तक्रार दाखल!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे.

Sharad Pawar in Belgaum
शरद पवार

महाविकासआघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुणे पोलिसांत दाखल झाली आहे. पुण्याच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी ती नोंदवली आहे. या प्रकरणी समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर चिथावणीखोर वक्तव्य, पोस्ट केल्या जात असून शरद पवारांना संपवण्याची भाषा केली जात असल्याचं या तक्रारीत खाबिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि काही सोशल मीडिया हत्येला चिथावणी देत असल्याचं तक्रारीमध्ये खाबिया यांनी नमूद केलं आहे.

Sharad Pawar Death Conspiracy Complaint


हेही वाचा – मला लाल शाईची सवय; हिरव्या शाईचा विचार कधी केला नाही-शरद पवार

शरद पवारांच्या हत्येचा कट! पुण्यात पत्रकाराविरुद्ध तक्रार दाखल..राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असुन मोदी व भाजपची सातत्याने समाजमाध्यमांवर बाजु मांडणारे पत्रकार भाऊ तोरसेकर आणि ‘पोस्टमन’ या पोर्टल वर हिंसक काॅमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.‘गेले अनेक महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेषाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जातील, अशी अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असं वाटत होतं.’ त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक सातत्याने यू ट्यूब, ‘पोस्टमन’ पोर्टल, टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली, तर तरुणांमध्ये व समाजात ‘शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे’, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Sushil Gawande ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 8, 2020

शरद पवारांच्या हत्येचा कट सुरू असून महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकण्याचं देखील कारस्थान सुरू असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असं या तक्रारीत म्हटलं आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर हे थांबेल असं वाटलं होतं. पण महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर भाऊ तोरसेकर, धनशाम पाटील आणि इतरांनी युट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओवरची भाषणं शरद पवारांना संपवलं पाहिजे, बॉम्ब-गोळ्यांचा वापर केला पाहिजे अशी चिथावणीखोर वक्तव्य त्यात आहेत असं निदर्शनास आलं आहे’, असं देखील या पत्रात म्हटलं आहे.