घरCORONA UPDATEमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांवर कारवाई; भर उन्हात काढल्या उठाबशा

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांवर कारवाई; भर उन्हात काढल्या उठाबशा

Subscribe

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असताना देखील पुण्यात मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. अशा नागरिकांची धरपकड करुन पोलिसांनी त्यांच्यावर धडक कारवाई केली आहे.

पोलिसांकडून संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेषत: नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन वेळोवेळी केलेले असताना पोलिसांचा आदेश धुडकावून हडपसर, बिबवेवाडी, स्वारगेट आदी भागात नागरिक सकाळी फिरायला घराबाहेर पडले. या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. एवढेच नव्हे तर १८८ नुसार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

स्वारगेट पोलिसांनी २०० जणांना घेतले ताब्यात

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ४८ नागरिकांवर हडपसर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर बिबवेवाडी, स्वारगेट पोलिसांकडून नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर स्वारगेट पोलिसांनी २०० जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर काहींना भर उन्हात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे.

दररोज घराबाहेर फिरायला जाणाऱ्या नागरिकांना वारंवार समजावले जात होते. तसेच त्यांना पकडून समज देऊन त्यांना घरी पाठविले जात होते. त्याचप्रमाणे एकमेकांशी संपर्क टाळावा, असे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र, नागरिकांवर त्याचा काहीही परिणाम दिसून येत नव्हता. त्यामुळे आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाचे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शक्यतो एकमेकांशी संपर्क टाळावा, यासाठी पोलिसांनी वेळोवेळी प्रबोधनही केले. मात्र, नागरिकांना त्याचे गांभीर्य नसून आदेशाचा भंग केला जात आहे. त्यामुळे नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. – रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे


हेही वाचा – Lockdown Crisis: पालघरमध्ये पाच घोड्यांचा उपासमारीने मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -