घरताज्या घडामोडीUnseasonal Rain : पुण्यात ढगाळ वातावरण, बारामती शहरात जोरदार पाऊस; अवकाळी पावसाने...

Unseasonal Rain : पुण्यात ढगाळ वातावरण, बारामती शहरात जोरदार पाऊस; अवकाळी पावसाने पिकांची नासाडी

Subscribe

बारामती (पुणे) – संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार 13 मेच्या रात्रीपासुनच बारामतीत पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. काल रात्री वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर येत आहे. बारामतीमध्ये आज सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

कडक्याच्या उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला. बारामतीसोबतच सोलापूर शहर आणि परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह सोलापूर शहर आणि परिसरात मंगळवारी (दि.14) पावसाची जोरदार बॅटिंग झाली. सुमारे तासभर पाऊस कोसळत होता.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुणे शहरातही आज दुपारपासून ढगाळ वातावरण राहिले.

- Advertisement -

अवकाळी पावसाने मुंबईत मोठे नुकसान केले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सोमवारी दुपारी अंधारुन आले. धुळीचे लोट उठले आणि पुणे, बारामतीसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, वाशी, कल्याण या भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडवून दिली. मुंबईतील घाटकोपरमध्ये 80 X 100 चौरस फुटांचे लोखंडी होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : Who is Bhavesh Bhinde : घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे आहे कोण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -