Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, प्रकृती गंभीर

संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, प्रकृती गंभीर

घरात एकटी पाहून बाहेर बोलावले..

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस महिला आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील विमाननगरमधील एका हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने मुलगी एकटी असल्याची खात्री करुन ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. पुण्यात दिवसेंदिवस आत्याचार आणि बलात्काराच्या घटनात वाढ होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. तर पिडित अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचास सुरु आहेत. या मुलीची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

काय आहे घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पिडित अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसह विमाननगर येथील लेबर कॅम्पमध्ये राहत आहेत. तिथेच एका हॉटेलमध्ये आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सुरक्षा रक्षकाचे नाव करण दिलीपकुमार गोस्वामी (वय २०) आहे. अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामावर गेल्याचे हेरुन आरोपी करणने चिमुरडीला घराबाहेर बोलवले आणि चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये घेऊन गेला. याच ठिकाणी नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

दरम्यान राज्यात महिलांवरील आत्याचार आणि बलात्कारांच्या प्रकरणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. पुणे, नागपुर,मराठवाड्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूरमध्येही दिवसा ढवळ्या खुणांच्या आणि हत्येच्या घटना घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी पुण्याच्या लोणीकंद येथे दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार करत २९ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे लोणीकंद परिसरात मोठी खळबळ माजली होती. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


हेही वाचा: लवासा प्रकल्पात शरद पवारांच्या निकटवर्तीयाला वाचवण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने कायदादुरुस्ती 


- Advertisement -

 

- Advertisement -