घर महाराष्ट्र पुणे पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून होणार सुटका; उभारणार 4 कोटींचा महामार्ग

पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून होणार सुटका; उभारणार 4 कोटींचा महामार्ग

Subscribe

मुंबई ते बंगळुरू मार्गावरील नऱ्हे ते रावते या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावते या भागात एलिव्हेटेड महामार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 4 हजार कोटी रुपयांचा DPR तयार केला असून, तो मान्यतेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

पुणे:  मुंबई ते बंगळुरू या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोंडीचा प्रवाशांना सामना करावा लागतो यावर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. मुंबई ते बंगळुरू मार्गावरील नऱ्हे ते रावते या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावते या भागात एलिव्हेटेड महामार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 4 हजार कोटी रुपयांचा DPR तयार केला असून, तो मान्यतेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. (Pune residents will now get relief from traffic jams 4 crore highway to be built Pune Bengaluru )

मुंबई ते बंगळुरू महामार्गावर नऱ्हे भागात सातत्यानं वाहतूक कोंडी होते. त्याशिवाय या भागात अपघाताच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधाकम विभाग आणि NHAI सोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महामार्गासंदर्भात माहिती दिली. मुंबई ते बंगळुरू महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल, वारजे आणि चांदणी चौकापर्यंतच्या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात आणि पुढे रावेतपर्यंत सतत वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी NHAI ने 4 हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड महामार्ग बांधण्यासाठी डीपीआर तयार केला आहे. तो मान्यतेसाठी आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मान्यता मिळाल्यानंतर एका वर्षामध्ये निविदा प्रक्रिया सुरू होईल, असं या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

देहूरोड ते सातारा महामार्ग केवळ घोषणाच

- Advertisement -

देहूरोड ते सातारा महामार्ग 2010 मध्ये सहा पदरी करण्याची घोषणा करण्यात आली होती. शहरी भागात सेवा रस्त्यांची घोषणा झाली. पण वडगाव- वारजे दरम्यान रस्ता सहापदरी नाही, फक्त पाच पदरीच आहे आणि त्याला सेवा रस्ताही नाही. यामुळे दररोज गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना जाणाऱ्या-येणाऱ्या हजारो वाहनचालकांना करावा लागत आहे.

(हेही वाचा: उगीच मला ट्रोल करू नका; कंत्राटी पदभरतीवरील आरोपाचे घोंगडे अजित पवारांनी फेकले )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -