घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : पुण्यातील शाळा बंद

करोना व्हायरस : पुण्यातील शाळा बंद

Subscribe

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून केला जात होता. मात्र, आता पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. रविवारी आणि मंगळवारी पुण्यात हे पाच रुग्ण सापडले असून त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम देखील रद्द करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पुण्यातील अनेक शाळांही पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल ११ मार्च ते १४ मार्च दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

या परिसरातील शाळा बंद राहणार

कात्रज, सिंहगड आणि नांदेड, सिटी परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही शाळांच्या परिक्षेच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे. तर सरकारी आणि महापालिकांच्या शाळा सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – चंद्रपुरात होळीला गालबोट; तिघांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -