घरताज्या घडामोडीपुणेकर वैज्ञानिकांनी शोधले Covid-19 विषाणूचे उत्पत्तिस्थान, पोल-खोल करणारा मोठा दावा

पुणेकर वैज्ञानिकांनी शोधले Covid-19 विषाणूचे उत्पत्तिस्थान, पोल-खोल करणारा मोठा दावा

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. अशातच कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल चीनला जगाने लक्ष्य केले आहे. आता भारतीय वैज्ञानिक जोडप्याने चीनची पोल-खोल करणारा मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा फैलाव आणि त्याचं उत्पत्तिस्थान चीनमधील वुहान लॅबच आहे. पुण्यातील वैज्ञानिक जोडपे डॉ. राहुल बाहुलीकर आणि डॉ. मोनाली राहलकर यांनी आणि जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये बसलेल्या अज्ञात लोकांसह, इंटरनेटवरून या संदर्भातील पुरावे गोळा केले आहेत. इंटरनेटवरून पुरावे गोळा करणारे लोक पत्रकार, हेर किंवा गुप्तहेर संस्थांचे लोक नसून ते अज्ञात लोक आहेत, ज्यांचे मुख्य स्त्रोत ट्विटर आणि इतर स्त्रोत असल्याचे सांगितले जात आहे.

या लोकांनी त्यांच्या टीमचे नाव ड्रॅस्ट्रिक (डीसेंट्रलाइज्ड रेडिकल ऑटोनॉमस सर्च टीम इनवेस्टिगेटिेंग कोविड-19) असे ठेवले आहे. या लोकांना असा विश्वास आहे की, कोरोनाचा फैलाव चीनच्या मच्छी मार्केटमधून नाही तर वुहानच्या लॅबमधून झाला आहे. यापूर्वी या टीमचा दावा षड्यंत्र आहे, असे म्हणून टाळण्यात आला होता. पण आता याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या टीममधील लोक चिनी दस्तऐवजाचे भाषांतर करून त्यांच्या पद्धतीने ते यासंदर्भातील तपास करत आहेत. चिनी शैक्षणिक कागदपत्रे आणि गुप्त कागदपत्रांनुसार याची सुरुवात २०१२ पासून होते. त्यावेळी खाणीतील सहा कामगारांना यनानच्या मोजियांगमध्ये माइनशाफ्ट साफ करण्यासाठी पाठविण्यात आले होते जेथे वटवाघूळांचा प्रादुर्भाव होता. या प्रादुर्भावामुळे तेथील कामगार तिथेच मरण पावले. २०१३ मध्ये, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे संचालक डॉ. शि झेंगली आणि त्यांची टीम माइनशाफ्टचे नमुना त्यांच्या प्रयोगशाळेत घेऊन आले.

- Advertisement -

डॉ. शि झेंगलीच्या मते, खाणीत असलेल्या बुरशीमुळे या कामगारांचा मृत्यू झाला. याउलट, ड्रैस्टिकने असा दावा केला की, शी यांना अज्ञात कोरोना स्ट्रेन सापडला, ज्याचे नाव त्यांनी आरएसबीटीकोव्ह / ४४९१ असे ठेवले. अहवालानुसार वुहान व्हायरलॉजी इन्स्टिट्यूटच्या २०१५-१७ च्या पेपरमध्ये याचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. हे खूप विवादास्पद प्रयोग होते ज्यामुळे विषाणू अधिक संसर्गजन्य बनण्यास कारणीभूत ठरला. हा सिद्धांतच असा सांगतो की कोरोनाचा स्फोट एका प्रयोगशाळेत झालेल्या चुकांमुळे झाला आणि जगाला त्याच्या फटका बसला.

चिनी व्हायरोलॉजी यांनी असे सांगितले की, अमेरिकेच्या शीर्ष कोरोनाव्हायरस सल्लागार अँथनी फाऊची यांच्या ई-मेलवरून हे सिद्ध होते की कोरोनाची उत्पत्ती वुहानमध्येच लॅबमधून झाली आहे. डॉक्टर ली-मेंग यान, ज्यांनी प्रथम वुहानमधील लॅबमधून कोरोनाच्या फैलाव झाल्याविषयी सांगितले होते. डॉक्टर ली-मेंग यान कोरोनावर संशोधन करणार्‍या पहिल्या लोकांपैकी एक होती. बीजिंगने हे प्रकरण लपविल्याचा आरोप करून तिला हे लपवून ठेवण्यास भाग पाडले गेले होते, असा तिने खुलासाही केला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -