पुणे : पतीच्या संमतीने पत्नीवर बलात्कार

पतीच्या संमतीने पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

rape

पतीच्या संमतीने पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी आणि पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा उघडकीस आला गुन्हा

पुण्यातील कात्रज याठिकाणी होस्टेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर नोव्हेंबर २०१९ मध्ये अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत पीडित महिलेने आपल्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पतीने दिलेल्या उतराने पत्नीला धक्काच बसला. पतीने सांगितले की, तुझ्यावर जो बलात्कार केला आहे, तो मीच करायला सांगितला होता. याप्रकरणी धनकवडी येथे राहणाऱ्या सरेश शैशराज शिंदे (३४) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे यांने या महिलेवर बलात्कार केला. या घटनेची माहिती तिने आपल्या पतीला दिली, त्यावेळी आपणच बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. या घटनेनंतर पीडित महिलेने या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर पीडित महिलेने आरोपी सुरेश शिंदे आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – पुणे : Acid फेकण्याची धमकी देत बलात्कार