अपघात सत्र सुरूच : पुण्यात बस आणि ट्रकची जोरदार धडक; चौघांचा मृत्यू, 20 जखमी

pune solapur highway accident bus hits stationary truck 4 dead 20 injured

पुण्यामधील दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तब्बल 20 जण जखमी झाले आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान बसमधील सर्वाधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5 च्या सुमारास सोलापूरहून पुण्याच्या दिशेने एक खासही बस जात होती, यावेळी या मार्गावर एका ट्रकचा टायर फुटल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता, याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या खासगी बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली, या अपघातावेळी बसमधून जवळपास 35 प्रवासी प्रवास करत होते. बस सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. या अपघातात बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात जवळपास 20 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 5 ते 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध महामार्गांवर अपघातांच सत्र सुरुच आहे. काल मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कारने बसला धडक दिली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील ड्रायव्हर जखमी झाला. या महामार्गावरील महिन्याभरातील हा दुसरा अपघात आहे.


union budget 2023 : आजच्या अर्थसंकल्पातून देशात आणखी मोठ्या आर्थिक सुधारणा होणार का?