घरताज्या घडामोडीपुण्यात मंडप डेकोरेटरने केली आत्महत्या

पुण्यात मंडप डेकोरेटरने केली आत्महत्या

Subscribe

पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप डेकोरेटरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

चंद्रपूर लगतच्या दुर्गापूर येथील समता नगर परिसरात राहणाऱ्या स्वप्निल चौधरी या २७ वर्षीय सलून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना अशीच एक घटना आज पुण्यात घडली आहे. पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप डेकोरेटरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे २ ते ६ यावेळेत घडली आहे. दरम्यान, मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; पुणे येथील हवेली याठिकाणी स्वप्निल उत्तम रायकर हे डेकोरेटर राहत होते. त्यांचा डेकोरेटरचा व्यवसाय होता. मात्र, अनेक दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. त्यामुळेच त्यांनी घरातील किचनमध्ये छताच्या हुकाला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलिसांनी दिली आहे. या मानसिक तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुस्तम शेख पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पुण्यातील सुखसागरच्या वाघजाईनगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले त्यानंतर या डेकोरेटरने आत्महत्या केल्याचे बोले जात आहे. मात्र, या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – धक्कादायक! पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -