घरताज्या घडामोडीफुटपाथवरून गाडी चालवणाऱ्या पुणेकरांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्या पुणेकरांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीत वाहनचालकाला दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागतो. मात्र, असे असलं तरी अनेकजण या वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीच्या नियमांमध्ये (Traffic Rules) बदल केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीत वाहनचालकाला दंडात्मक कारवाईचा (Traffic Fine) सामना करावा लागतो. मात्र, असे असलं तरी अनेकजण या वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडल्याची माहिती समोर येत आहे. (Pune Traffic Police Action On Footpath Vehicle Driver Photo Viral)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात (Pune) मागच्या काही दिवसांमध्ये पुण्यात वाहतूक कोंडी (Traffic Jam) मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाहतुक कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो आहे. परिणामी काही जण फूटपाथवरून गाडी चालवत आहेत. या फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी आणि पुण्यातील या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) मोहीम राबवली आहे.

- Advertisement -

पुणे पोलिसांनी ट्वीटरच्या माध्यमातून काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी कारवाई करतानाचे फोटो टाकले आहेत. त्याचबरोबर फुटपाथवरून गाडी न चालवण्याचे अवाहनही पुणे पोलिसांनी यावेळी केले आहे. जर फुटपाथवरून गाडी चालवणारे चालक दिसले तर त्यांच्यावर जागेवर कारवाई केली जाणार असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुणे पोलिसांकडून चालकांना शिस्त लावण्यासाठी वेगवेगळे प्रोग्रॅम राबवले जातात. त्यामध्ये नागरिकांची जनजागृती करण्यात येते. तर आता फुटपाथवरून गाडी न चालवण्याची जनजागृती पोलिसांकडून केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खारघर दुर्घटनाप्रकरणी ठाकरे गट आक्रमक, संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -