घरमहाराष्ट्रपुण्यात ‘वॉर्डबॉय’ बनला डॉक्टर; गर्भवतीवर केले उपचार

पुण्यात ‘वॉर्डबॉय’ बनला डॉक्टर; गर्भवतीवर केले उपचार

Subscribe

वडगाव शेरी परिसरातील अनुप हॉस्पिटल येथील वॉर्डबॉयनेच डॉक्टर असल्याचे सांगून गर्भवती महिलेवर उपचार केले

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात असणाऱ्या अनुप हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयनेच गर्भवती महिलेवर डॉक्टर असल्याचे सांगत उपचार केले. या उपचारादरम्यान महिलेला जास्त रक्तस्राव होऊ लागल्याने त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या घटनेमध्ये बाळाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याची प्रकृती नाजूक झाली. सातत्याने तीन दिवस उपचार सुरू होते, मात्र या तीन दिवसाच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. या घडलेल्या प्रकाराबद्दल चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही तक्रार वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केली आहे. यानुसार ३६ वर्षीय हरी शंकर ठाकूरसह इतरांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

असा घडला प्रकार

हा प्रकार गेल्या महिन्यातच झाला असून या धक्क्यातून सावरल्यानंतर या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करणारा व्यक्ती खासगी कंपनीत नोकरी करत असून त्यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती. नऊ जून रोजी रात्री अचानक त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी वडगाव शेरी येथील अनुप रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. या ठिकाणी एक व्यक्ती डॉक्टरच्या कपड्यात होती. तक्रारदारांनी त्या व्यक्तीला तुम्ही डॉक्टर का, अशी विचारणी करून पत्नीच्या पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचे सांगून महिलेच्या आरोग्याची तपासणी केली. ही तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या वेशात असणाऱ्या व्यक्तीने कोणाला तरी फोन लावला आणि समोरून मिळालेल्या आदेशावरून महिलेची तपासणी करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

महिलेच्या तपासणीनंतर महिला जोराने ओरडू लागली, यावेळी पत्नीने रक्तस्राव होत असल्याचे सांगितल्यावर ही या वॉर्डबॉय असणाऱ्या ‘डॉक्टर’ने त्याकडे दुर्लक्ष केले. रक्तस्राव झाल्यानंतर त्याने दोन गोळ्या घेण्यास सांगितले. मात्र, काही वेळातच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्या वेळी तो ‘डॉक्टर’ घाबरल्याने त्याने तत्काळ दुसऱ्या रुग्णालयातील एका डॉक्टरांना फोन करून याची माहिती दिली. तसेच, महिलेला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास पतीला सांगितले. तक्रारदार यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या डॉक्टरच्या सांगण्यावरून कमांड हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल करण्यात आले.

 डॉक्टर हा वॉर्डबॉय असल्याचे तक्रारीदरम्यान उघड

महिलेची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरू केले. मात्र, रक्तस्राव जास्त झाल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारादरम्यान बाळाची प्रकृती नाजूक झाल्याने तीन दिवसांनी बाळाचा मृत्यू झाला. पहिल्यांदा दाखल केलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरची माहिती तक्रारदाराने घेतली असता त्यांना उपचार करणारी व्यक्ती डॉक्टर नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून चंदननगर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -