घरताज्या घडामोडीPune Water Supply: आजपासून पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी केला जाणार; महापौर झाले...

Pune Water Supply: आजपासून पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी केला जाणार; महापौर झाले आक्रमक

Subscribe

पुणे शहरातील पाणीपुरवठा संदर्भातील निर्णयामुळे पाणी वाद पेटण्याची शक्यता दिसत आहे. भामा आसखेड धरणातून पुणे शहराचा पाणीपुरवठा आज, ३ डिसेंबरपासून कमी केला जाणार आहे. या निर्णयामुळे महापौर मुरलीधर मोहोळ आक्रमक झाले असून त्यांनी काही आरोप करत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाणीपुरवठा कमी न करण्याची विनंती केली आहे.

माहितीनुसार, भामा आसखेड धरणातून पुण्याला दिवसाला ३८० टीएमसटी एवढा पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता पाटबंधारे विभागाकडून हा पाणीपुरवठा कमी जाणार आहे. यामुळे पुणेकरांसमोर पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार असल्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी भामा आसखेड धरणातून पोलिसांच्या बंदोबस्तात पाणीपुरवठा कमी केला जाणार असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. तसेच त्यांनी पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पाणीपुरवठा कमी करण्याची विनंती केली आहे. पण निर्णयामुळे येत्या काळात पुण्यात पाणी वाद पेटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काहीशाच्या अशाच प्रकारच्या निर्णयामुळे सोलापूरमध्येही वाद पेटलेला. उजनी धरणातील पाणी इंद्रापूरला वळविल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत होत आणि यामुळे चांगलेच राजकारण पेटले. तसेच यामुळे सोलापुरात इंद्रापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा याला विरोध दर्शवला होता. अखेर १८ मेला उजणी धरणाचे पाणी कोणालाही दिले जाणार नसल्याचे जयंत पाटील यांनी घोषित केले आणि शासन निर्णय रद्द केला. त्याचप्रमाणे पुण्यासंदर्भात पाणीपुरवठाबाबत निर्णय रद्द होतो की काय? हे येत्या काळात समजेल.


हेही वाचा – राज्यातील मागास तालुक्यातील नागरीकांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध होणार – अजित पवार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -