Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे 'शिवनेरी' जिल्ह्याची मागणी का केली? आमदार महेश यांनी सांगितलं कारण

‘शिवनेरी’ जिल्ह्याची मागणी का केली? आमदार महेश यांनी सांगितलं कारण

Subscribe

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी- चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तार वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि शिवनेरी हा नवा जिल्हा करावा आणि पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र तालुका म्हणून निर्मिती करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी- चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तार वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि शिवनेरी हा नवा जिल्हा करावा आणि पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र तालुका म्हणून निर्मिती करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. आता अशी मागणी करण्यामागचं कारणही त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. ( Pune Why was the demand for Shivneri district  BJP MLA Mahesh landge told the reason )

महेश लांडगे यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राजकीय चर्चा घडू लागल्या आहेत आता त्यानंतर लांडगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही मागणी माझी वैयक्तिक आहे. मला वाटतं की, शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. लवकर उपलब्ध झाल्या पाहिजेत. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 80 लाखांच्या पुढे गेली आहे. जर विभागन केलं, तर छोट्यामोठ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. विद्यार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र लवकर हवे असतात. योजना राबवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीची यंत्रणा विभागली गेली, तर त्याचा फायदा लोकांना होतो. जुन्नरच्या कोपऱ्यातल्या आदिवासी बांधवाला अचानक शासकीय यंत्रणेची गरज असेल तर ती लगेच पुरवता आली पाहिजे एवढाच माझा उद्देश आहे, असं महेश लांडगे म्हणाले.

- Advertisement -

172 किलोमीटर जुन्नरच्या कोपऱ्यापर्यंतच्या लोकांना पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जावं लागलं. माळशिरस, नाणेघाटातल्या माणसाला जर जिल्हाधिकारी कार्यालयात यायचं असेल तर त्यासाठी त्याला यंत्रणा लवकर उपलब्ध व्हायला हवी. या प्रवासात त्याचे 4-4 तास जात असतील, तर त्याचा पूर्ण दिवस जातो. त्याचा परिणाम त्याच्या कामावर आणि उत्पन्नावरही होतो, असाही मुद्दा लांडगे यांनी उपस्थित केला.

( हेही वाचा:  “काँग्रेसने जास्त खूश होऊ नये…”, रणनितीकार प्रशांत किशोर यांनी का दिला असा सल्ला? )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -