घरमहाराष्ट्रसायबर चोरी : महिलेची २४ लाखाची फसवणूक

सायबर चोरी : महिलेची २४ लाखाची फसवणूक

Subscribe

सायबर चोरी करत एका महिलेची २४ लाखाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुणे येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या ऑनलाईन बँकिंग ही फारच सोयीची आणि सोपी गोष्ट झाली आहे. प्रत्येकाच्या फोनवर कोणते ना कोणतेतरी अ‍ॅप बँकेचे व्यवहार करण्यासाठी दिसून येतात. पण जर तुम्ही बँकिंगचे व्यवहार ऑनलाइन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. एका सायबर चोरट्यांनी बनावट मेल आयडीद्वारे धनकवडी पुणे येथील एका महिलेची २४ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत राधा घाटगे (४५) यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

भारतातील कंपन्यांनी आर्थिक कारणासाठी खासगी इ-मेलचा वापर करू नये. तसेच, परदेशातील कंपनीने पैसे पाठविण्यास सांगितले तरी फोन करून खात्री करावी. त्यानंतरच पैशाचे व्यवहार करावे, असे अवाहन सायबर सेलकडून करण्यात आले असताना देखील एका महिला फसवल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात जर्मनीच्या कंपनीतील मेहर या अधिकाऱ्याच्या नावाने तक्रारदार महिलेला यांच्या कंपनीच्या इ – मेलवर मेल आला. भारतातून काही गोष्टी घ्यायच्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात एका कंपनीच्या खात्यावर २३ लाख ९३ हजार ९८२ रुपये पाठविण्यास सांगण्यात आले होते. तक्रारदार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्या खात्यावर पैसे पाठविले. काही दिवसांनी पुन्हा जर्मनीच्या कंपनीचा अशाच पद्धतीचा आणखी एक इ-मेल आला. तसेच, आणखी २८ लाख रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. या महिलेने कोणतीही खात्री न करता पैसे पाठवले. मात्र कोणत्याही वस्तू विकत न घेतल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आहे. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

वाचा – शासनाचा ‘कर’ बुडवणाऱ्या ‘ऑनलाईन लॉटरी’ सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -