घरमहाराष्ट्रपुणे200 kg Royal Icing Cake : 'या' तरुणीची तिसऱ्यांदा वर्ल्ड बुक ऑफ...

200 kg Royal Icing Cake : ‘या’ तरुणीची तिसऱ्यांदा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Subscribe

पुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॉयल आयसिंग केक कलाकार प्राची धबल देब (Prachi Dhabal Deb) यांनी नुकतेच एक नवीन जागतिक विक्रम रचला आहे. प्राची देब यांनी 200 किलोची वेगन ‘रॉयल आयसिंग केक’द्वारे (Royal icing cake) भारतीय राजवाड्याची रचना साकारत स्वतः चाच विक्रम मोडला आहे आणि त्यांनी लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये तिसऱ्यांदा नोंद केली आहे.

जगभरात केकचे शौकीन आहेत. आपण सर्वांनीच वेगवेगळ्या आकाराचे, प्लेवर्सचे आणि रंगाचे केक पाहिले आहेत, मात्र राजवाडा आणि मोठ-मोठ्या महलांचा केक आपण कोणीच कधीच पाहिला नसेल. मात्र पुण्यातील प्राची धबल देब यांनी शामियाना ते राजवाडा, बनारसी साज शृंगार रॉयल आयसिंगपासून अशा विविध प्रकारचे केक बनवले आहेत. प्राची देब यांनी यापूर्वी तब्बल 100 किलोचा मिलान कॅथेड्रील केकची रचना केली होती. यावेळी त्यांनी 200 किलोची वेगन रॉयल आयसिंगद्वारे भारतीय राजवाड्याची रचना साकारत स्वतः चाच विक्रम मोडला आहे. त्यांच्या या केकची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने नोंद केली आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशमधील रीवा येथे जन्मलेल्या प्राची या सध्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील रहाटणी परिसरात राहतात. त्यांनी आपले शालेय शिक्षण उत्तराखंड येथील डेहराडून येथे पूर्ण केले. तसेच कोलकाता येथून महाविद्यालयीन पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे पती हे मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत आणि सद्या पुण्यामध्ये काम करत आहेत.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने तिनदा घेतली नोंद
प्राची देब यांनी रॉयल आयसिंग या कलेचे शिक्षण युनायटेड किंगडममधील जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. प्राची देब यांनी सुरुवातीला 3-इंच उंच शामियानापासून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक कलाकृती साकारल्या. नुकतेच त्यांनी केकच्या माध्यमातून भारतीय रचना शास्त्रावर आधारित एका भव्य राजवाडयाची रचना केली आहे.  ही कलाकृती तब्बल 10 फूट लांब, 4.7 फूट उंच आणि 200 किलो ‘रॉयल आयसिंग’ केकची रचना केली. ‘रॉयल आयसिंग’ केकसाठी अंड्याचा वापर होतो, मात्र प्राची देब यांनी भारतीय बाजारपेठेचा विचार करून पूर्णत: शाकाहारी “विगन रॉयल आयसिंग” विकसित केले. ‘विगन रॉयल आयसिंग’ केक या प्रकारात त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या उत्तम कलात्मकतेसाठी त्यांना “क्वीन ऑफ रॉयल आयसिंग” असे संबोधले जाते. त्यांच्या या कलाकृतीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने तीन वेळा नोंद घेतली आहे.

- Advertisement -

माझा मागील विक्रम मोडण्याचा नेहमीच प्रयत्न असतो
प्राची देब यांनी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये नोंद झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपल्या देशातील भव्य राजवाड्यांचे वैशिष्ट्य, त्यांचे वैभव साकारण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सामन्यत: ‘रॉयल आयसिंग’चा वापर नाजूक पाइपिंग आणि लेसी आयसिंग डिझाइनसाठी केला जात, मात्र मी गेली अनेक वर्षे या ‘रॉयल आयसिंग’द्वारे भव्य आणि मजबूत रचना साकारत आहे. नवीन संकल्पना मांडण्यासाठी आणि माझा मागील विक्रम मोडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धती, माध्यम, रचना आणि तंत्रांचा वापर करून भव्य कलाकृती साकारण्याचा प्रयत्न करते, असे प्राची देब यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -