घर महाराष्ट्र पुणे पुण्यातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर: 'या' शाळा अनधिकृत, तुमची मुलं या...

पुण्यातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर: ‘या’ शाळा अनधिकृत, तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?

Subscribe

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्लू बेल्स शाळेचं मान्यतापत्र तपासलं. त्यावरुन हे उघड झालं आहे. शाळांची तपासणी करताना काही शाळांकडील मान्यताप्राप्त पत्र बोगस असल्याचे आढळून आले आहे.

पुणे शहरातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे. पुण्याच्या कोंढवा भागातील के.झेड नाॅलेज सेंटर या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्या ठिकाणी एनआयएने कारवाई करुन दोन मजले सील केले होते. धक्कादायक म्हणजे त्याच इमारतीत ब्लू बेल नावाची शाळा चालवली जाते. ही शाळा अनधिकृत असल्याचं उघड झालं होतं.  (300 schools in Pune on education department s radar know the unauthorized schools blue bells school unauthorised  )

पुण्यात शाळांची तपासणी सुरु

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्लू बेल्स शाळेचं मान्यतापत्र तपासलं. त्यावरुन हे उघड झालं आहे. शाळांची तपासणी करताना काही शाळांकडील मान्यताप्राप्त पत्र बोगस असल्याचे आढळून आले आहे.

ब्लू बेल्स शाळेत दहशतवादी प्रशिक्षण

- Advertisement -

दहशतवादी कारवायांच्या तयारीसाठी वापरण्यात आलेल्या कोंढवा येथील इमारतीतील ब्लू बेल्स ही शाळा अनधिकृत आढळून आली. त्यानंतर शिक्षण विभागाने पुणे विभागातील महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची तपासणी केली आणि त्यात ही शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील अनधिकृत शाळा

अनधिकृत शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेने केले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘आमच्याकडे गुजरातची पावडर’; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भाजपची कोंडी )

अनधिकृत शाळांची यादी

 • प्रियांस फ्री प्रायमरी स्कूल कासुर्डी दौंड
 • केके इंटरनॅशनल स्कूल बेटवाडी दौंड
 • जय हिंद पब्लिक स्कूल भोसे खेड
 • मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड
 • अंकूर इंग्लिश स्कूल जांभे मुळशी
 • साई बालाजी पब्लिक स्कूल नेरे मुळशी
 • श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर पुरंदर
 • पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल लोणी काळभोर हवेली
 • कल्पवृक्ष इंग्लिश मीडियम स्कूल क्रिकेट वाडी हवेली
 • क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी हवेली
 • किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल खडकवासला हवेली
 • एस एन बीपी टेक्नो स्कूल बावधन मुळशी
- Advertisment -