घरमहाराष्ट्रपुणेदगडूशेठ गणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण; 31 हजार महिलांच्या स्वराने निनादला परिसर

दगडूशेठ गणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण; 31 हजार महिलांच्या स्वराने निनादला परिसर

Subscribe

आज ऋषीपंचमीच्या दिवशी पहाटे श्री गणेशासमोर 31 हजार महिलांनी अथर्वशीर्षचे पठण केले(ganpati atharv shirsh). गणेशाच्या स्तुतीने वातावरणही मंगलमय झाले.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे समस्त पुणेकरांचं आराध्य दैवत. काल पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्रच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. आज गणशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. पुण्यातील श्रीमंती दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठाणाचे आयोजन करण्यात आले होते. आज ऋषीपंचमीच्या दिवशी पहाटे श्री गणेशासमोर 31 हजार महिलांनी अथर्वशीर्षचे पठण केले(ganpati atharv shirsh). गणेशाच्या स्तुतीने वातावरणही मंगलमय झाले. दोन वर्षांच्या एवढ्या मोठ्या कालावधीनंतर भाविक पुन्हा एकदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव अनुभवत आहेत.

हे ही वाचा –  गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांनी घेतले गणपतीचे दर्शन

- Advertisement -

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती(shrimant dagadu sheth halwai ganpati pune) ट्रस्ट आणि सुवर्ण तरुण मंडळ यांनी ऋषीपंचमीचे औचित्य साधून पहाटे अथर्वशीर्षचे पठण आयोजित केले होते. यामध्ये 31 हजार महिलांनी उस्तव मंडपात बसून श्रींच्या मूर्ती समोर अथर्वशीर्षचे पठण केले. गजाननाच्या जयघोषाने पहाटेचे मंगलमय वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. यावेळी जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या सुद्धा उपस्थित होत्या. यांच्या सोबतच परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठणाचे हे 35 वे वर्ष होते.

- Advertisement -

हे ही वाचा – गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात वाद, महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

यावेळी अनुराधा पौडवाल(anuradha paudwal) म्हणाल्या, “जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरीचे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वांनी एकत्रितपणे नक्की करूया”. डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या, प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्तीमुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल”.

यावेळी महिलांनी पारंपरिक पेहराव केला होता. उस्तव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंत महिलांनी शिस्तबद्ध रांगेत बसून अथर्वशीर्षचे पठण केले. महिलांनी शंखनाद करत ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला वंदन केले.

हे ही वाचा – देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा; जयंत पाटलांचं गणरायाकडे साकडं

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -