Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे भाऊ म्हणून मी...; MPSCच्या विद्यार्थ्यांने पुण्यामध्ये केली आत्महत्या

भाऊ म्हणून मी…; MPSCच्या विद्यार्थ्यांने पुण्यामध्ये केली आत्महत्या

Subscribe

पुणे : देशात तरुण-तरुणींच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करण्याचे कारण सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विजय तुकाराम नांगरे (२१) (Vijay Tukaram Nangre) हा विद्यार्थी परभणी गावचा राहणारा असून तो सध्या पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात तो शिक्षण घेत होता आणि एमपीएससीच्या परीक्षेचाही अभ्यास करत होता. त्यामुळे तो विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय वसतीगृहात वास्तव्यास होता. आज (15 मे) सकाळी विजयने वसतीगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासाच्या वर्गात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार वसतीगृहातील इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानतंर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी वसतीगृहाकडे धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी विजयची खोली तपासली असता त्यांना एक सुसाईड नोट मिळाली असून आत्महत्येचे कारण समोर आले आहे. या नोटमध्ये विजयने लिहिले की, ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. मी मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मी काही करू शकलो नाही.’

विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रे भापकर यांनी सांगितले की, विजयने यापूर्वीही नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दोन ते तीन वेळा त्याने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येकवेळी त्याला वाचवण्यात यश आले होते. अखेर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत.

आयटी अभियंत्याने केली होती आत्महत्या
- Advertisement -

पुण्यातील औंध परिसरात दोन महिन्यांपूर्वी आयटी अभियंता असलेल्या 44 वर्षीय तरुणाने बायको आणि आठ वर्षीय मुलाला आधी विष दिले आणि त्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर पॉलिथीन बॅग टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः गळफास घेत जीवन संपवले होते. आत्महत्या केलेला तरुण सुदिप्तो गांगुली (44) हा पश्चिम बंगालचा राहणारा असून तो पुण्यातील टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. परंतु त्याच्या घरातून कुठलीही सुसाईड नोट मिळाली नव्हती.

- Advertisment -