Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे राज्य सरकारकडून मोठा निर्णय, दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

राज्य सरकारकडून मोठा निर्णय, दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

Subscribe

पुणे : देशातील अनेक गणेशभक्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या गणेशभक्तांसाठी आणि खास करून पुण्यातील गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दगडूशेठ गणपती मंदिराला (Dagdusheth Ganapati Temple) आता पर्याटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

पुण्यातील दगडूशेठ मंदिर अनेक गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशभरातील गणेशभक्त एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी दगडूशेठ गणपती मंदिराला पर्याटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दगडूशेठ हलवाई मंदिर यापुढे ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. याशिवाय चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत दिले आहे. शुक्रवारी (19 मे) पुणे जिल्हा नियोजन बैठक पार पडली, यावेळी इतर निर्णयही घेण्यात आले.

- Advertisement -

राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी; यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 10 ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांचा विकास, पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावांसाठी सुविधा, पोलिस दलाचे अद्ययावतीकरण करणे, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्या सह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्हा नियोजन बैठकीक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -