घरमहाराष्ट्रपुणेललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट; आणखी चार जणांची नावं समोर

ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट; आणखी चार जणांची नावं समोर

Subscribe

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलच्या आणखी चार सहकाऱ्यांची नावं समोर आली आहेत.

पुणे: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलच्या आणखी चार सहकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. सध्या हे सर्व आरोपी राज्यभरातील वेगवेगळ्या जेलमध्ये आहेत. त्यांना आता पुण्यात आणले जाणार आहे. त्यांच्या चौकशीत आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Big update on Lalit Patil case The names of four more people are in front)

या गुन्ह्यात अटक केलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत केलेल्या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांत मेफेड्रॉन या अमली पदार्थांचे उत्पादन व वितरण करण्यासाठी टोळी कार्यरत असून, अरविंदकुमार लोहरे हा टोळीचा प्रमुख आहे. त्याने ललित पाटील याला येरवडा कारागृहात मेफेड्रॉन तयार करण्याचे सूत्र दिले होते, असे आताापर्यंतच्या तपासात उघड झालं आहे.

- Advertisement -

या प्रकरणात आता आणखी चार नावां समोर आल्याने पुणे पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. विविध कारागृहांत असलेल्या या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेऊन मंगळवारी मकोका न्यायालयात हजर केले जाणार आहे. आधीचे आरोपी न नव्याने अटक करण्यात येणाऱ्या चार आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील चंद्रकिर साळवी यांनी दिली.

ललित पाटीलसह तिघांच्या कोठडीत वाढ

अमली पदार्थल तस्करी रॅकेटप्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्यााने ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत सात दिवसांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा-  शरद पवारांच्या व्हायरल जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “10वीला असताना…”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -