पोटनिवडणुकीसंदर्भात गाफील न राहता पूर्वतयारी सुरूय, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक आता लवकरच होणार आहे. त्यानिमित्तानं भाजपचे आमदार चंद्रकांत पाटलांनी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की भाजपा उमेदवार देणार आणि तो उमेदवार कोण असणार याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. यासंदर्भात भाजपाची बैठक झाली असून, त्या बैठकीत चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया आज झाली नाही. चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच निवडणुकीसंदर्भात गाफील न राहता पूर्वतयारी आणि बैठका घेत असल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाची प्रक्रिया ठरलेली आहे. इच्छुकांची नावं प्रदेशाध्यक्षांकडे जात असतात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे. त्यानंतर ही नावं केंद्रीय संसदीय बोर्डाकडे जातात. त्यानंतर दिल्लीतून निर्णय होतो. या पोटनिवडणुकीची जबाबदारी महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आलीय. लक्ष्मण जगताप हे जनमानसात लोकप्रिय होते. आपल्या कार्यातून त्यांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी अधोरेखित केले. दोन्ही पोटनिवडणुका आता 26 फेब्रुवारीला होणार आहेत, तर दोन्ही जागांची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. आधी हे मतदान 27 फेब्रुवारीला होणार होते.

भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Chandrakant Patil kasba chinchwad by election