घरमहाराष्ट्रपुणेभूमिका स्पष्ट तरी काँग्रेस उमेदवार आणि भाजप नेते घेतायत मनसेच्या स्थानिक नेत्यांची...

भूमिका स्पष्ट तरी काँग्रेस उमेदवार आणि भाजप नेते घेतायत मनसेच्या स्थानिक नेत्यांची भेट

Subscribe

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि मविआने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण तरी सुद्धा काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे नेते मनसेच्या स्थानिक नेत्यांची भेट घेत आहेत.

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या दोन्ही जागांसाठी 26 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. पण त्याआधी पुण्यामध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. या दोन्ही मतदारसंघात बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. पण असे झाले नाही. पण या निवडणुकांबाबत मनसेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पण भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला उपस्थित न राहण्याचे देखील त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. पण असे असले तरी काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे नेते मनसेच्या स्थानिक नेत्यांची भेट घेताना दिसून येत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातील मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली. तर काँग्रेसचे कसबा पेठ विधानसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारादरम्यान मनसेच्या कार्यालयाला भेट दिली.

- Advertisement -

मनसेने या निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. पण गुरुवारी कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची प्रचार फेरी सुरु असताना त्यांनी ही प्रचार फेरी थेट मनसेच्या कार्यालयात नेली. यावेळी त्याठिकाणी मनसेचे साईनाथ बाबर सुद्धा उपस्थित होते. पण मनसेकडून रवींद्र धंगेकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ज्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले.

दरम्यान, याबाबतचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये लिहिण्यात आले आहे की, काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे दोन मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात श्रीमती अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये.

- Advertisement -

हेही वाचा – हसन मुश्रीफांचा पाय आणखी खोलात; तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीचा विरोध

मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला असला तरी भाजप उमेदवाराच्या प्रचाराला उपस्थित न राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -