घरमहाराष्ट्रपुणेNikhil Wagle : मरण डोळ्यासमोर होतं, मात्र...; हल्ल्यानंतर निखिल वागळे यांची पहिली...

Nikhil Wagle : मरण डोळ्यासमोर होतं, मात्र…; हल्ल्यानंतर निखिल वागळे यांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निखिल वागळे हे आज ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी संध्याकाळच्या वेळेला निर्भया बनो कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर शाहीफेक करत हल्ला करण्यात आला. पुणे पोलिसांच्या मदतीने निखिल वागळे या हल्ल्यातून बचावले आणि ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी उपस्थितासमोर आपला अनुभव व्यक्त करताना म्हटले की, मरण डोळ्यासमोर होतं, मात्र ड्रायव्हरमुळे आम्ही वाचलो. माझ्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आंदोलकांना आपण माफ करतो, असेही त्यांनी म्हटले. (Death was in sight but we survived because of the driver Nikhil Wagle first reaction after the attack)

हेही वाचा – Nikhil Wagle : भेकड सरकारकडून आता पोलिसांचा वापर सुरू; पुण्यातील घटनेप्रकरणी विरोधक आक्रमक

- Advertisement -

‘निर्भय बनो’ या कार्यक्रमात निखिल वागळे भाषण करायला आले, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर व्यक्त होताना निखिल वागळे म्हणाले की, आता जिवंत झाल्यासारखं वाटतं आहे. शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत, सगळी आपली परंपरा आहे. आपली संतांची परंपरा आहे. आपली सर्व परंपरा आज खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी या धक्क्यात होतो, पण आता मी घोषणा झाल्यावर नॉर्मल झालो आहे. जेव्हा गाडीच्या काचा फुटल्या तेव्हा असीमने माझ्या डोक्याला हात लावला. श्रेया फ्रंट सीटला बसली होती. तिचं आम्ही डोकं खाली केलं म्हणून ती वाचली. जोपर्यंत आमची लोकं वाचतील, तोपर्यंत तुमचं काही खरं नाही, असं मोठं वक्तव्यही निखिल वागळे यांनी कार्यक्रमात केलं.

सर्व हल्लेखोरांना मी माफ केलं

पुण्यातील हल्ल्याप्रकरणी बोलताना निखिल वागळे म्हणाले की, पुणे हे खरंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. पण या शहराला गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात कलंक लावला जात आहे. या शहरात 1942 मध्ये आचार्य अत्रे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता. असे म्हणत रामाची भक्ती करतात तो नथुराम कोणत्या शहरातला आहे? असा प्रश्न उपस्थित करत तोही याच शहरातला आहे. आचार्य अत्रे असं म्हणाले होते की, आम्हाला मारणारे मेले, पण आम्ही जिवंत आहोत. मी सुद्धा एवढंच म्हणेन की, तेही जिवंत राहो आणि आम्ही सुद्धा जिवंत राहो. या सर्व हल्लेखोरांना मी माफ केलं आहे, अशी भावना निखिल वागळे यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : निखिल वागळे कितीही चुकीचे बोलले तरी…; पुणे हल्लाप्रकरणी फडणवीसांचे भाष्य

मला संधी मिळाली तर भाजपवाल्यांचंही परिवर्तन करेन 

हल्याप्रकरणी बोलताना निखिल वागळे म्हणाले की, तुम्ही मला मारायला आलात. पण जेव्हा महात्मा फुले यांना मारायला आले होते, तेव्हा त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं होतं. त्यानंतर हल्लेखोर फुले यांच्यासोबत काम करायला लागले. त्यामुळे मला सुद्धी संधी मिळाली तर या भाजपवाल्यांचंही परिवर्तन करून टाकेल. तो माझा मार्ग आहे. कारण हा माझ्यावरील सातवा हल्ला आहे. माझ्यावर 1979 साली पहिला हल्ला झाला. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागून हल्ला केला होता. भेकड लोकांनी हल्ला केला होता, अशी आठवण निखिल वागळे यांनी सांगितली.

मरण डोळ्यासमोर होतं

आतापर्यंत माझ्यावर सहा हल्ले झाले आहेत आणि आता मी सातव्या हल्ल्यातूनही वाचलो आहे. पण आज जेव्हा हल्ला झाला तेव्हा मरण डोळ्यासमोर होतं. ड्रायव्हर वैभवमुळे आम्ही वाचलो. प्रशांत यांचा मी आभारी आहे. कारण त्यांनी आम्हाला भाजपवाल्यांपासून वाचवलं. जोपर्यंत निखिल वागळे जिवंत आहे, तोपर्यंत फॅसिसमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार, असा इशाराही निखिल वागळे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – Old Pension Scheme: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अधिवेशनात लवकरच निर्णय; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही

अनेकांना तुम्ही मारलं आहे. त्यामुळे तुम्ही कधीही आम्हाला मारु शकतात. कारण आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे. तसेच माझ्या मनात एक विश्वास आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला फुले, आंबेडकर किंवा महात्मा गांधी सारखं कुणीतरी वाचवतं. आपल्याला हे लोक मारु शकत नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करतच राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. ही लढाई साधी नाही, ही फॅसिसम विरोधातील आहे, असा आरोपही निखिल वागळे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -