घरमहाराष्ट्रपुणेDevendra Fadnavis : तंत्रज्ञानामध्ये लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता; सरकारचा गुगलसोबत सामंजस्य...

Devendra Fadnavis : तंत्रज्ञानामध्ये लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता; सरकारचा गुगलसोबत सामंजस्य करार

Subscribe

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुगलसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झाला आहे. आज पुण्यात हा कार्यक्रम पार पडला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञानामध्ये लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे. (Devendra Fadnavis Technology ability to change people lives Govt MoU with Google)

हेही वाचा – Baba Siddique : झिशान सिद्दीकी काँग्रेसला रामराम करणार? बाबा सिद्दीकेंचे सूचक वक्तव्य

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञानामध्ये लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे आणि गुगल ही एक अत्यंत महत्त्वाची टेक्नोलॉजी कंपनी आहे. या कंपनीचा जगभरात प्रचंड मोठा विस्तार आहे. गुगलने एआयमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळे नागरिकांचं जीवन हे चांगलं होण्याकरता आपल्याला मदत मिळेल. कारण गुगल सगळ्या टेक्नोलॉजी क्षेत्रात नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. तसेच लोकोपयोगी कृत्रिम बुद्धिमत्ता अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. त्यांची जी शक्ती आहे, ती आपल्याला महाराष्ट्रात कशी वापरता येईल या संदर्भातला हा करार आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेती, सस्टेनेबिलिटी, स्टार्टअप, हेल्थकेअर, कौशल्य आदी विविध क्षेत्रात आम्ही (सरकार आणि गुगल) एकत्र काम करणार आहोत. एआयमुळे लोकांचं जीवन बदलू शकतं, प्रशासकीय कामात सुधारणा होऊ शकते. काही ॲप्स त्यांनी दाखवले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी जमिनीत काय पिकवलं पाहिजे, त्याची वाढ कशी झाली आहे, याचं मॉनिटरिंग आणि डेटा आपण मिळू शकतो. या मोबाईल ॲपवरून शेतकऱ्याने काय वापरलं पाहिजे, त्यावर कोणती किड येऊ शकते, हे शेतकरी जाणून घेऊ शकतो, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Politics : मनसेत धुसफूस! राज ठाकरेंनी परशुराम उपरकरांना पक्षातून काढले

एआयमुळे रोजगाराच्या असिमीत संधी उपलब्ध होणार

एआयसंदर्भातील माहिती देत असताना पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले की, या कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक रोजगार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर झाल्यास किती रोजगारांवर गदा येईल? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एआयमुळे रोजगाराच्या असिमीत संधी उपलब्ध होणार आहेत. एआय आल्यानंतर रोजगाराचं काय होईल असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. परंतु, यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्या संधींकरता आपलं राज्य भविष्यासाठी तयार होत आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -