घरमहाराष्ट्रपुणे'मोचा'मुळे देशातील काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज

‘मोचा’मुळे देशातील काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज

Subscribe

पुणे : मोचा चक्रीवादळाचे (mocha cyclone) आज तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 700 किमी अंतरावर आहे आणि मागील 6 तासात हे चक्रीवादळ 10 किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामान बदल होत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला सकाळी सातेसात वाजल्यापासूनच उष्णता जाणवत असल्यामुळे नागरिकांना हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यानंतर या आठवड्यातही राज्यातील काही भागात उष्णतेची लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर्षी उष्णतेने गतवर्षातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दिल्लीत धुळीच्या वादळाची शक्यता
आज दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. त्यामुळे दिल्लीतील अनेक भागात वादळ आणि धुळीचे वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरा आणि मिझोराममध्ये आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

बिहारमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा
आज उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्याच्या काही भागासह आसपासच्या डोंगराळ भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे. याशिवाय त्रिपुरा, मिझोराम, आसाम, नागालँड आणि मणिपूरच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. बिहारमध्ये आज (14 मे) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर ओडीसा आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -