घरमहाराष्ट्रपुणेसंजय राऊतांच्या घरातील रोकडवर मुख्यमंत्र्यांचं नाव, शिंदे म्हणाले मी त्यांच्या घरी...

संजय राऊतांच्या घरातील रोकडवर मुख्यमंत्र्यांचं नाव, शिंदे म्हणाले मी त्यांच्या घरी…

Subscribe

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यासह पाच जिल्ह्यांसाठी आढावा बैठक घेतली. आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या घरी धाडसत्रादरम्यान काही कॅश सापडली होती. त्यावर एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) नाव होतं. त्यावरून आज शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की, “पैसे माझ्या घरी सापडले नाही. मी त्यांच्या घरी जाऊन त्यावर माझं नाव लिहिन का?” आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यासह पाच जिल्ह्यांसाठी आढावा बैठक घेतली. आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा – संजय राऊतप्रकरणी ईडीकडून आणखी दोन ठिकाणी छापे, अनेकांना बजावले समन्स

- Advertisement -

रविवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार यांच्या घरी पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी धाड मारली. या धाडसत्रात संजय राऊत यांच्या घरी काही रोकड जप्त केली. यावर एकनाथ शिंदे असं नाव असल्याचा दावा संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी केला होता. त्यामुळे ती रक्कम एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, याप्रकरणी आज पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

- Advertisement -

पुण्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक आज झाली. यावेळी सर्व खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे झालेल पिकांचे नुकसान, जनावरांची हानी, मनुष्यहानी, शेतीपिकांचे नुकसान, दरडी कोसळणे आदीचा आढावा घेतला गेला. पिक पेरण्यांचे नियोजन, पंतप्रधान पिक कर्जाचे वाटप, धरणाचा पाणीसाठा, सिंचन क्षमता, आवास योजना, कोविड स्थिती, केंद्र सरकारच्या बुस्टर डोस आदी इतरही योजनांबाबत बैठकीत चर्चा झाली. तिर्थ क्षेत्रांच्या विकासाची गती काय आहे याबाबतही या आढावा बैठकीत चर्चा झाली असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -