घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात लक्ष्मीपूजनाला फटाक्यांच्या आतषबाजीने 'अग्निदेवा'चा कोप, 23 घटनांची नोंद

पुण्यात लक्ष्मीपूजनाला फटाक्यांच्या आतषबाजीने ‘अग्निदेवा’चा कोप, 23 घटनांची नोंद

Subscribe

पुणे शहरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 23 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये बरेच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे: पुणे शहरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 23 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये बरेच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही. तसंच, कुठलीही जीवितहानी झालेली नाही. (Fire caught due to firecrackers on Lakshmi Pooja in Pune 23 incidents recorded)

दिवाळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बहुतेक लोक दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडून हा सण साजरा करतात. त्यातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून फटाके फोडू नये, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तरी अनेक नागरिकांकडून निष्काळजीपणानं फटाके फोडण्यात येतात. दिवाळीच्या या धामधूमीत अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातील बहुतेक ठिकाणी लागलेल्या आगीमुळे घर व दुकानांचं अतोनात नुकसान झालं आहे.

- Advertisement -

या ठिकाणी लागल्या आगी

 • रास्ता पेठ, के ई एम हॉस्पीटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग
 • कोथरूड, सुतार दवाखान्याजवळ दुकानामध्ये आग
 • वडारवाडी, पांडवनगर पोलीस चौकीजवळ घरामध्ये आग
 • कोंढवा बुद्रुक पोलीस चौकीसमोर कचऱ्याला आग
 • नाना पेठ, चाचा हलवाईजवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग
 • घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिरावजळ झाडाला आग
 • कोंढवा शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग
 • वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग
 • आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग
 • शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोर तिसऱ्या मजल्यावर आग
 • गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग
 • पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज 1 येथे घराच्या गॅलरीमध्ये आग
 • रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग
 • लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत ग‌‌‌ॅलरीमध्ये आग
 • विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटलजवळ इमारतीत गॅलरीत आग
 • वडारवाडी, पांडवनगर येथे घरामध्ये आग
 • धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग
 • गुरुवार पेठ, मामलेदार कचेरीजवळ घरामध्ये आग
 • बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग
 • कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग

(हेही वाचा: “ललित पाटीलसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा”, रवींद्र धंगेकरांची मागणी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -