घरमहाराष्ट्रपुणेकसब्यातील कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी थेट फडणवीसांविरोधात निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

कसब्यातील कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी थेट फडणवीसांविरोधात निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

Subscribe

त्यामुळे चर्चेत असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीला आता वेगळं वळण लागलं आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेच असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांमध्ये कसब्याचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मात्र या निकालापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीला आता वेगळं वळण लागलं आहे.

भापज नेते देवेंद्र फडणवीस हे कसब्यात प्रचारसभेत आले होते. त्यावेळी भाषण करताना त्यांनी कसबा हा हिंदुत्ववाद्यांचा गड असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराचा मुद्दा उपस्थित करत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपकडून झाल्याची चर्चा होती. याच गोष्टींवर आक्षेप घेत रवींद्र धंगेकर यांनी फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली. यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता यावर भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सकाळपासून या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून सातव्या फेरीअखेर कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी २५,८९७ मतं, भाजपचे हेमंत रासने यांना २४,६२३ मतं मिळाली आहेत. तर चिंचवडमध्ये सहाव्या फेरी अखेर भाजप उमेदवार अश्विनी जगताप 3319 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे नाना काटे हे पिछाडीवर असून १७,२१० मतं आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ७,१४१ इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -