घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024 : रुपाली चाकणकरांनी केली ईव्हीएमची पूजा, निवडणूक अधिकारीही गोंधळले;...

Lok Sabha 2024 : रुपाली चाकणकरांनी केली ईव्हीएमची पूजा, निवडणूक अधिकारीही गोंधळले; गुन्हा दाखल

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात मतदान सुरु असताना रुपाली चाकणकरांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पुणे : आज लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक घडामोडी घडल्या. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली आणि आणखी एक वाद निर्माण झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली असून त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अचानक हा प्रकार घडल्याने स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला होता. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (lok sabha 2024 fir register against Rupali chakankar asj)

हेही वाचा : Lok Sabha 2024: इंदापूरात कार्यकर्त्याला शिवीगाळ; अजित पवार म्हणाले- दत्तात्रय भरणे तिथे नसते तर…

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर खडकवासलामधील एका मतदान केंद्रावर गेल्या. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ईव्हीएम मशीनची पूजादेखील केली. रुपाली चाकणकर या मतदानासाठी येतानाच पूजा करण्यासाठी पूर्वतयारीत आल्या होत्या. पण अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी गोंधळात पडले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे, हे निवडणूक आयोगाच्या नियमांविरुद्ध असल्याने निवडणूक अधिकाऱ्यानेच तक्रार दाखल केली. यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यात पुणे पोलिसांकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : तीन बोटे आपल्याकडे येतात हे विसरू नये, ठाकरे गटाने मोदींना सुनावले

- Advertisement -

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एका पेक्षा एक मग’ म्हणत टोला लगावला. त्यांनी ट्विट करत म्हंटले की, “एका पेक्षा एक नग आहेत . एकीकडे जग एकविसाव्या शतकात चंद्र, मंगळावर पादाक्रांत करत आहे, तर दुसरीकडे विश्वगुरूला मतदान करा म्हणणाऱ्यांच्या नाना तऱ्हा पाहायला मिळत आहेत.” असा टोला त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, सुनेत्रा पवार या यंदाच्या निवडणुकीमध्ये जिंकून येणार आणि सुप्रिया सुळेंचा पराभव होणार असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी दर्शवला.


Edited By : Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -