घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात पाणीकपात, महापालिकेचा निर्णय; 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

पुण्यात पाणीकपात, महापालिकेचा निर्णय; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद

Subscribe

18 मे पासून आता पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मागच्या काही आठवड्यांपासून पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. अखेर त्याबाबत निर्णय झाला असून 18 मे पासून आता पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगर पालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा सर्वसाधारण पाऊस आणि एल निनो सक्रिय राहण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. ( Maharashtra Pune news water cut for one day in a week from may 18 on behalf of municipal corporation in Pune city )

यंदाचा पावसाळा सर्वसआधारण राहण्याचा अंदाज आणि एल निनोच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्यानेही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यास सांगितलं आहे. महापालिकेनेही तशी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल आहे.

- Advertisement -

दक्षिण महासागरामध्ये अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मॉन्सून लांबणीवर होणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्य शासनाने पाणी टंचाईचा आराख़ा सादर करण्याच्या स्थानिक प्रशासनाला दिलेल्या होत्या.

धरणातील पाणीसाठा बघता आणि भविष्यातील पाऊस पाडण्याचा अंदाज बघता पुणे महानगर पालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अनेक हवामान अभ्यासकांनी पावसाबाबत काही अंदाज वर्तवले आहे. त्यामध्ये जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा असणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: honey trapped: डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात; एटीएसची कोर्टात माहिती )

यंदाचा पावसाळा सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आणि एल निनोच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्यानेही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. महापालिकेनेही तशी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यामध्ये पाण्याची काटकसर जितक्या प्रमाणात करत येईल तितक्या प्रमाणात पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -