घरमहाराष्ट्रपुणे'मी काय खाते-पिते याकडे अनेक पुरुष लक्ष ठेवून'; सुप्रिया सुळे शाहांकडे करणार सुरक्षेची मागणी

‘मी काय खाते-पिते याकडे अनेक पुरुष लक्ष ठेवून’; सुप्रिया सुळे शाहांकडे करणार सुरक्षेची मागणी

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) अनेक वेळा नॉनव्हेज खाऊन मंदिरात गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी काय खाते-पिते याकडे इंदापूर आणि पुरंदरमधील अनेक पुरुष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्याकडे सुरक्षेची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माध्यमांसमोर केले आहे.

सुप्रिया सुळे सध्या दौंडच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील नानविज येथे बोलताना त्या म्हणाल्या की, मी नॉनव्हेज खाल्ले नाही आणि कोणी आरोप केला हे देखील मला माहित नाही. परंतु गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विनंती करणार आहे की, ‘मी काय खाते आणि काय पिते’ याकडे इंदापूर आणि पुरंदरमधील अनेक पुरुष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून मला सुरक्षा दिली पाहिजे. जे पुरुष माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. मी इंदापूरमध्ये काय खाल्ले हे त्यांना कसे माहिती?, असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी त्यादिवशी व्हेज खाल्ले होते, असेही सांगितले.

- Advertisement -

दडपशाहीचं सरकार विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवतात
जयंत पाटील यांना पाठवण्यात आलेल्या ईडी कारवाई बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यासंदर्भात माझ सकाळी जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. चौकशी अमच्यासाठी नवीन नाही. शरद पवारांना देखील अशी नोटीस पाठवली होती, त्यांनतर महाराष्ट्रात काय झाल हे आपल्याला माहिती आहे. हे दडपशाहीचे सरकार विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवतात. आधीची सरकारमध्ये स्वायत्त संस्था होत्या, पण आता अदृश्य हात या संस्था चालवतो आहे. जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस पाठवली जाते. जयंत पाटील यांना लग्नाच्या वाढदिसानिमित्त ईडीची नोटीस हे गिफ्ट आले आहे.

अनिल देशमुख यांच्या घरी १०९ वेळा धाड पडली
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा धाड पडली आहे. नवाब मलिक जे काही बोलत होते ते आज खरं होत आहे. त्यामुळे मलिक आज जेलमध्ये आहेत. आम्ही भाजपमध्ये गेल्यापासून आम्हाला झोप शांत लागते, असे भाजपाचे नेतेच सांगत आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -