मध्यरात्री पुण्यातील बिराजदार झोपडपट्टीला भीषण आग, १२ ते १५ घरे जळून खाक

pune_fair

पुणे शहरातील रक्षकनगर परिसरात पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. बिराजदार झोपडपट्टीला ही आग लागली. आगीत 12 ते 15 घरे जळून खात झाली आहेत. अग्निशामक दलाच्या 5 गाड्यांसह जवान घटनास्थळी दाखल होते आगीवर निंयत्रण मिळवले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण –

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग 3 च्या सुमारास लागल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

आर्थिक मदतीची नागरिकांची मागणी –

दरम्यान, या आगीत आर्थिक नुकसान झालेल्या रहिवाशांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने लवकरात लवकर मदत करण्यात मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे.