Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे Metro Recruitment: पुण्यातील मेट्रोसाठी नोकरभरती; मुलाखत बिहारमध्ये, मनसेकडून तीव्र विरोध

Metro Recruitment: पुण्यातील मेट्रोसाठी नोकरभरती; मुलाखत बिहारमध्ये, मनसेकडून तीव्र विरोध

Subscribe

पुणे मेट्रो प्रशासनाने बिहार राज्यातील पाटणा शहरात भरतीसाठी मुलाखती घेणार असल्याच्या निषेधार्थ पीएमआरडीएचे औंध येथील कार्यालयासमोर पुणे शहर मनसेच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

पुणे मेट्रो प्रशासनाने बिहार राज्यातील पाटणा शहरात भरतीसाठी मुलाखती घेणार असल्याच्या निषेधार्थ पीएमआरडीएचे औंध येथील कार्यालयासमोर पुणे शहर मनसेच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ( Metro Recruitment Pune Metro Recruitment Interview In Bihar strong opposition from MNS )

शिवाजीनगर ते हिंजवाडी मार्गावरील मेट्रोलचे काम वेगात सुरु आहे. आगामी वर्षात हे काम पूर्ण होऊन मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने मेट्रोसाठी विविध पदांवर आवश्यक कुशल मनुष्यबळ घेण्यासाठी बिहारमधील काही वृत्तांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील निवेदन मनसे नेते राजेंद्र वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे, बाळा शेडगे, रणजीत शिरोळे, हेमंत संभूस यांनी पीएमआरडीला दिले. यावेळी कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी विद्यार्थी सेना राज्य संघटनक प्रशांत कनोजिया, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर व महाराष्ट्र मनसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

पुण्यात मेट्रो प्रक्लप राबवताना त्यामध्ये भुमीपुत्रांना रोजगार देणार असल्याचे राज्य सरकार व मेट्रो प्रशासनाने सांगितले होते. परंतु आता प्रत्यक्षात जाहिरात मात्र बिहारमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दल मनसेने संताप व्यक्त केला. मंगळवारी दुपारी मनसेच्यावतीने औंध येथील पीएमआरडीएच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी मेट्रो व पीएमआरडीए प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

- Advertisement -

( हेही वाचा: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कंटेनरचा ब्रेक फेल; सहा वाहनांना दिली धडक )

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये गुणवत्ता, क्षमता असतानाही पुणे मेट्रो प्रशासन मेट्रो भरती बिहार राज्यातून कशाला? स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, असा राज्य सरकारचा आदेश असताना मेट्रो प्रशासन बिहारमधील पाटणा येथे मुलाखती घेणार आहे. तिथे जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील भुमीपुत्रांच्या विरोधी भुमिकेचा मनसे निषेध करत आहे. या भरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिलेली नाही. बिहारमधील नोकरभरती तातडीने थांबवावी, पुणे मेट्रो भरतीत भूमीपुत्रांना स्थान द्यावे, अशी मागणी साईनाथ बाबर यांनी केली आहे.

 

- Advertisment -