Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे MNS Pune : "महाराष्ट्रात मनसेचा पहिला खासदार..." वसंत मोरेंचा विश्वास

MNS Pune : “महाराष्ट्रात मनसेचा पहिला खासदार…” वसंत मोरेंचा विश्वास

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच बारामती शहरात मोठा मेळावा घेणार असल्याचे वसंत मोरेंनी माहिती दिली.

मुंबई : ‘महाराष्ट्रात मनसेचा पहिला खासदार मी असेल’, असा विश्वास मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच बारामती शहरात मोठा मेळावा घेणार असल्याचे वसंत मोरेंनी माहिती दिली. यावेळी वसंत मोरेंनी बारामतीत मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकनंतर माध्यमांशी बोलताना खासदारक होण्याची इच्छा बोलून दाखवली.

पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते भावी आमदार म्हणून पाहत आहेत, पत्रकारांच्या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले, “नाही, यंदा मला तर खासदार व्हायचे आहे. मी पुण्याचा खासदार होण्यासाठी मी इच्छुक असून मला पक्षाने संधी दिली. तर मी मनसेचा पहिला खासदार होईल, असे मला शंभर टक्के वाटते.” वसंत मोरे पुढे म्हणाले, “बारामती, पुरंदर, इंदापूर आणि दौंडला भेट देणार असून या चाही तालुक्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या आहेत. पक्ष मजबूत करणे हा आमचा उद्देश आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – मला आता ठाम भूमिका घ्यावीच लागेल, बॅनरच्या वादावरून वसंत मोरेंचा नाराजीचा सूर

मनसेचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा – राज ठाकरे

जालन्यातील घटनेचा राज्यभरात निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मराठा आंदोलनकर्ते जरांगेशी फोनवरून संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी जखमींची विचारपूस केली. यावेळी मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद घडवला. राज ठाकरे म्हणाले, “कोणतीही काळजी करू नका, मनसेचा तुम्हाला पाठिंबा आहे.”

- Advertisement -

- Advertisment -