घरमहाराष्ट्रपुणेमोहसीन शेख हत्या; हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई निर्दोष

मोहसीन शेख हत्या; हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई निर्दोष

Subscribe

पुण्यातील हडपसर येथे २ जून २०१४ रोजी शेखची जमावाने हत्या केली होती. त्यावेळी सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तेव्हा धनंजय देसाईने चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर शेख हा त्याचा भाऊ व मित्रांसह हडपस येथील एक मशिदीत जात होता. शेखच्या डोक्यावर टोती होती. या एवढ्या एका कारणावरुन शेख व त्याच्या मित्रांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला.  

 

पुणेः मोहसीन शेख या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई व संघटनेच्या २० जणांची स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी निर्दाेष सुटका केली. शेखच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

पुण्यातील हडपसर येथे २ जून २०१४ रोजी शेखची जमावाने हत्या केली होती. त्यावेळी सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तेव्हा धनंजय देसाईने चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर शेख हा त्याचा भाऊ व मित्रांसह हडपस येथील एक मशिदीत जात होता. तेथे बाईकवरून काहीजण आले. शेखच्या डोक्यावर टोती होती. या एवढ्या एका कारणावरुन शेख व त्याच्या मित्रांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला.

शेख हा मुळचा सोलापूरचा रहिवाशी होता. तो पुण्यात आय.टी. कंपनीत काम करत होता. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. ही हत्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी देसाईलाही अटक झाली. देसाईसह संघटनेच्या २० कार्यकर्त्यांवर शेखच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणात adv उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र काही दिवसांनी उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणातून माघार घेतली.

- Advertisement -

धनंजय देसाई हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. शेखच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. adv निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून माघार घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या. मात्र याचा खटला सुरु राहिला. आरोपींवर आरोप निश्चिती झाली. त्यांनी आरोप फेटाळल्यानंतर सरकारी पक्षाने त्यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर केले. मात्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल देत देसाईसह सर्व आरोपींची शेखच्या हत्येतून सुटका केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -