Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे मनपा अधिकाऱ्याने लाथ मारून अन्नाचं भांडं पाडलं; सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर व्यक्त केला...

मनपा अधिकाऱ्याने लाथ मारून अन्नाचं भांडं पाडलं; सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर व्यक्त केला संताप

Subscribe

पुणे : पालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याने फेरीवाल्याच्या टपरीवरील अन्नाचं पातेलं लाथ मारून पाडलं. या अधिकाऱ्यांच्या कृतीचा संतापजनक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या (pune Municipal) अतिक्रमण विभागाताली अधिकाऱ्याने फेरीवाल्यांवर कारवाई करताना लाथ मारून अन्नाचं भाडं पाडलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी संबंधित अधिकाऱ्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना म्हटले की, “पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.” यावेळी त्यांनी पुणे पालिकेला टॅगही केले आहे.

- Advertisement -

अतिक्रमण विभागाच्या प्रमुख पदावरून हकालपट्टींची मागणी
माधव जगताप यांची अतिक्रमण विभागाच्या प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमोल ढमाले यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. त्यांनी म्हटले की, माधव जगताप यांचे कृत्य कायदा पायदळी तुडवणारे आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. सध्याच्या महागाईच्या काळात बेरोजगार युवा आणि विधवा महिला रस्त्यावर हातगाडी लावून कष्ट आपले पोट भरत आहेत.
पालिकेने अनधिकृत बाबींवर कारवाई केली पाहिजे, पण ही कारवाई करताना आपली माणूसकी सोडून एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय, अशी भूमिका अतिक्रमण विभाग सातत्याने घेताना दिसते आहे. अतिक्रमण कारवाई करताना माधव जगताप यांनी केलेले कृत्य पालिकेची प्रतिमा मलीन करणारे आहे. त्यामुळे माधव जगताप यांच्याकडून याप्रकरणी लेखी खुलासा मागवावा आणि त्यांच्याकडून तात्काळ अतिक्रमण विभागाचा पदभार काढून घ्यावा, अशी मागणी अमोल ढमाले यांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -